Thursday, June 10, 2010
शिवसेनेमुळेच मराठी माणूस मुंबईत टिकून राहीला.. हे वाक्य आपण सर्वांनीच अनेकदा ऐकलंय.. मात्र आता हे वाक्य मागे पडणार असे संकेत मिळू लागलेत.. आमच्या शेजारी ७-८ वर्षांची एक छोटी मुलगी राहते. तिचा गडबड गोंधळ कायम सुरुच असतो, मात्र कालची तिची आरोळी माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण करुन गेली... मनसेचा विजय असो, अशी होती ती आरोळी. सहज मनात विचार आला, माझ्या पिढीला शिवसेना माहिती झाली ती मुंबईतल्या दंगलींमुळे, बाळासाहेबांच्या कुणाची भीडभाड न बाळगता घणाघाती हल्ले करणाऱ्या भाषणांमुळे, शिवसेनेच्या भगव्यामुळे, दिंदुत्वाच्या मुद्दयामुळे...आणि त्या आधीच्यांना ती माहिती होती ती मराठीच्या चळवळीमुळे..पण आजच्या पिढीला शिवसेना माहिती असावी असं काहीच घडत नाहिये.. हे सत्यय... तुलनेत आजच्या पिढीला मनसे माहिती आहे. राज ठाकरे माहिती आहे. याला कारणंही तशीच आहेत.मनसेची मराठी पाट्यांसाठी मुंबईत झालेली आंदोलनं, शाळेतील मराठी भाषा सक्तीसाठी झालेली आंदोलनं( प्रत्यक्ष झालं काही नाही हे आपण जाणतोच) वीज दरवाढीचं आंदोलन आणि त्या पेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्यांनी राज ठाकरेंची भाषणं ऐकलीयत, त्यामुळे मनसेची हवा निर्माण झालिय..... या सर्व गोष्टी आत्ताची पिढी पाहातेय.. त्यामुळे कदाचित त्यांचा आदर्श म्हणूनही ते पुढे राज ठाकरे यांना पाहू लागतील! शिवसेनेचा सध्याचा काळ फारच वाईट सुरुय. मुंबईतला पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्षाला लोकसभेच्या वेळी मुंबईतल्या त्यांच्या मुख्य स्थानालाच धक्का लागल्यानं अनेकांनी आचंबा व्यक्त केला. आतातर विधानसभेला तर १३ जागांवर निवडून येत मुंबईसकट इतरही ठिकाणी मराठी मतांना खेचण्याचं काम मनसेने केले. त्याचा त्रास बाळासाहेबांना होतोय हे सेनेच्या मुखपत्रातल्या आग्रलेखातूनही दिसून आलं. पण इतकच नाही तर तब्बल ३ दिवसांनंतर माध्यमांसमोर हजर होऊनही सेनेच्या कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांची राजकीय अपरिपक्वताच दिसून आली. ही झाली सेनेच्या पडझडीबद्दलची काही वरकरणी दिसणारी कारणं. आता मनसेची हवा कानिर्माण झाली यावर नजर टाकुया- सर्वसाधारणपणे तरुण चेहेरे पाहायला सर्वांनाच आवडतं किंवा वयस्क चेहेऱ्यांच्या तुलनेत ते बरं वाटतं.( उदाहरण.- एकाच वेळी टीव्ही स्क्रीनवर मनमोहन सिंग आणि राहुल गांधी असतील तर आपसूकच नजर राहूल गांधीकडे वळते.) ही मानसिकता आहेय. आणि हेच घडतंय मनसे आणि शिवसेनेच्या बाबतीत. मनसेचे प्रमुख चेहेरे तीशी-चाळीशीतले आहेत, या उलट शिवसेनेचे जे काही मुख्य चेहेरे आहेत(अजून आदित्य सक्रिय नाहीय),पण जे आहेत ते जवळपास पन्नाशीच्या जवळचे आहेत. (त्यामुळेच फरक तो पडता है!) एकंदरितच आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याची सत्वपरीक्षा आता शिवसेनेवर आलिय. तुलनेत मनसेला आता संपूर्ण महाराष्ट्र काबिज करायचाय आणि त्यांना तरुणांची, महिलांची चागंली साथ मिळतेय. मुळात हा प्रश्न प्रामुख्यानं जाणवण्याचं कारण आजची पिढीच आहे. त्यांच्यावरर सध्या वृत्तपत्रापेक्षा टेलिव्हीजन माध्यमांचा प्रभाव जास्त आहे. ज्या थेट फायदा मनसेला मिळतोय असं होऊ नये असं सेनेला वाटत असेल तर अत्ताच सावधान होण्याची गरज आहेय हे नक्की!
Labels:
आजची पिढी,
मनसे आणि सेना..
Subscribe to:
Posts (Atom)